तुम्ही कोणत्या प्रकारचे पालक आहात?तुम्हीच ठरवा त्याकरिता जाणून घ्या ,पालकांचे 15 प्रकार.
तुम्ही कोणत्या प्रकारचे पालक आहात?तुम्हीच ठरवा त्याकरिता जाणून घ्या, पालकांचे 15 प्रकार.
भाग -१
नमस्कार,
तुम्ही कोणत्या प्रकारचे पालक आहात हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का?
पालकांचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का?
तुम्हाला तुमच्यामध्ये पालक म्हणून सकारात्मक बदल व्हावा असे वाटते का?
जर वरील प्रश्नांची उत्तरे हो असतील तर हा ब्लॉग नक्कीच तुमच्याकरीताच आहे.
चला तर मग सुरुवात करूया...
पालकांचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारांमध्ये कोणते ना कोणते पालक येतातच. असेही पालक आहेत जे त्यांचा स्वभाव कित्येक वर्ष आंधळेपणाने पुढे घेऊन जातात. आपल्या वागण्यामध्ये काही चुकीचे आहे. असे त्यांना कधीच वाटत नाही . इतर लोकांचा कधी त्यांना विचारही येत नाही .मुलांना योग्य संस्कार दिले पाहिजे किंवा मुलांचं कुठे काही चुकतं काय? आपलं काही चुकत तर नाही ना? किंवा स्वतःमध्ये काही बदल करायला हवेत का? आपण आपल्या मुलांसाठी आपल्या जीवनशैलीत काही बदल केलाय काय ?आपला आपण स्वभाव किती बदलला ?आपण स्वतः मध्ये आचारांमध्ये विचारांमध्ये किती बदल केलेत याचा विचार प्रत्येक पालकांनी करणे गरजेचे आहे.
नमस्कार! मी भाग्यश्री फुले positive parent coach मिशन positive parents या प्लॅटफॉर्मची संस्थापिका.
येत्या तीन वर्षात दहा हजार पालकांना आनंदी, सदृढ आणि समतोल पाल्य घडविण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे.
चला तर पालकांचे प्रकार पाहूयात-
1. घाबरलेले पालक-
असे पालक बरेचदा शहरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अशा पालकांमध्ये एक कॉमन गोष्ट पाहायला मिळते आणि ती म्हणजे भीती. आजूबाजूला जे काही सुरू आहे. त्याचा माझ्या मुलांवर काही परिणाम तर होणार नाही ना? एखादी जाहिरात किंवा न्युज पाहिली की, अशा पालकांच्या मनात सुरू होणारा प्रश्न म्हणजे याचा माझ्या मुलांवर वाईट परिणाम तर होणार नाही ना? त्यामुळे मुलांवर धडपणे त्यांना रागावताही येत नाही आणि ओरडताही येत नाही. नेमकं काय करावं ?एखादी वस्तू मुलाला द्यावी की नाही द्यावी? प्रत्येक गोष्टीमध्ये पुढील परिणाम कसे असतील. उदाहरणात, मुलगा खेळायला जाणार म्हटलं की तो पडणार तर नाही ना? त्याला काही लागणार तर नाही ना? या सगळ्यांमध्ये अडकलेली असतात. परंतु अशा पालकांची मुले आपल्या आई वडिलांना बरोबर ओळखतात. आणि त्यांची मुले देखील हवं तिथे नाटकं करतात. बरोबर हवी ती वस्तू त्यांच्याकडून मिळवतात. कारण त्यांची मुलं देखील पालकांना घाबरवण्यात एक्सपर्ट झालेली असतात.
2.गोंधळलेले पालक-
पालकांचा दुसरा प्रकार म्हणजेच गोंधळलेले पालक म्हणजेच कन्फ्युज पालक .जे कायम गोंधळलेले असतात. योग्य निर्णय आणि त्याचा होणारा परिणाम यामुळे ते कुठेतरी निर्णय घ्यायला कमी पडतात. उदाहरणार्थ ,मुलाला मराठी माध्यमात घालावे की, इंग्रजी माध्यमात मग, एकदा इंग्रजी माध्यमात घातलं की मग, कोणीतरी संगीतल आणि कुठून तरी ऐकलं की, मातृभाषेतून शिक्षण देणे आवश्यक आहे.तर, मग परत त्याचं मीडियम चेंज करतात. त्याच प्रमाणे कुणीतरी त्यांना सांगितलं की ,मुलांना हॉस्टेलला ठेवलं की त्यांना छान सवयी लागतात .मुले स्वावलंबी बनतात .तर, अजून दुसऱ्या कुणी त्यांना सांगितलं की मुलांना आपल्या जवळ ठेवायला हवं. तर ,मग अशावेळी असे पालक फार गोंधळतात आणि पालक गोंधळलेले पाहून मुले आपला निर्णय घेऊन मोकळे होतात.
3. आंधळे पालक-
असे पालक जे आपल्या मुलांच्या प्रेमाने आंधळे झालेले असतात. त्यामुळे त्यांना आंधळे पालक असे म्हणता येईल. कारण अशा पालकांना आपल्या मुलांव्यतिरिक्त काहीच सुचत नाही. कुठेही गेले तरी ,ते आपल्या मुलांविषयीच बोलतील आणि प्रत्येक कार्यक्रमात समारंभात सेंटर ऑफ अट्रॅक्शन त्यांचा मुलगा किंवा मुलगी कसे होईल याची ते काळजी घेतात. कुठूनही विषय निघाला तरी ते फिरून परत आपल्या मुला पर्यंतच बरोबर आणतात. ते मुलांचे कौतुक करताना कधीच थकत नाहीत. लहान मुलांचे पालक या प्रकारात येतात. एखादी मोठी चूक जरी केली असेल तरी ती चूक नसून ते बरोबर कसं आहे ते पटवून सांगतील. आणि कुठेही त्यांना थांबवत नाहीत . चुकीच्या वाईट वागणुकीला, खाण्यापिण्याच्या अस्वास्थकर सवई यांच्या मुलांना लागतात. त्यामुळे मुलांच्या आरोग्याविषयी तक्रारी सुरू होतात .अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. मुलांना अति स्वातंत्र असल्या कारणाने झोपेची वेळ, गृहपाठाची वेळ नसते .स्वतः मुले आपला स्क्रीन टाइम ठरवितात व त्यामुळे नको त्या सवयींना बळी पडतात. परंतु त्यामुळे मुलांमध्ये काही स्वाभिमान व समाज कौशल्य येतात .परंतु मुले चिडचिडे ,सतत मागणी करणारे स्वार्थी आणि स्वनियम न करणारे बनू शकतात.
4. दुर्लक्ष करणारे पालक-
पालकांचा अजून एक प्रकार तो म्हणजेच दुर्लक्ष करणारे पालक .प्रत्येक वेळी जाऊ म्हणणारे, कळेल त्याला हळू हळू म्हणणारे ,चुकांकडे दुर्लक्ष करणारे असे हे पालक असतात. मी एक असे पालक पाहिले आहे. की ज्यांचं 6-7 वर्षाच ते मूल घरात कोणी आलं की ,कुठलाही विचार न करता, समोरचा लहान की मोठा न पाहता मारत सुटायचं. अशावेळी पालक त्याला काहीही योग्य व अयोग्य समजाऊन न सांगता मुलाकडे कौतुकाने बघतात. अशा ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळे मोठा झाल्यावर मूळ त्याचं विकृत रूप समोर येत. आपण बघितलं असेल रत्यावर बरीच मुलं सुसाट आडवी-तिडवी गाडी चालवत सुटतात. त्यामुळे योग्य वेळी पालकांनी मुलांना थांबवल नाही, शिस्त लावली नाही तर भविष्यात दूरगामी परिणाम दिसतात.
5. कडक पालक-
शिस्त प्रिय पालक असे पालक फार कडक आणि बऱ्याच वेळेला कारण नसताना रागवतात आणि चिडतात .अशीच प्रतिमा यांची घरात झालेली असते .संवादाची एक मार्गी पद्धत व मुलांसाठी कठोर नियम हे पालक स्थापित करीत असतात. मुलांकडे वाटाघाटी करिता फारशी जागा राहत नाही. नियम सहसा स्पष्ट केले जात नाहीत .चुका चुकांसाठी सहसा शिक्षा केली जाते. मुलांकडून अपेक्षा दिसून येते. अशा पालकांची पालकत्व यामुळे मूळ लाजाळू सामाजिक दृष्ट्या असमर्थ असू शकतात .त्याचप्रमाणे कडक नियमावलीमुळे आणि कठोर नियम आणि शिक्षा यामुळे बंड करण्यास प्रवाहित करतात व लहानपणी जी मुले आपल्या वडिलांना सुपरमॅन शक्तिमान समजत होती. आनंदाने नाचत होती ती मोठी झाल्यावर हिटलर समजतात. वडील आले की आवरा- आवरी ,चोरी करणार ,अभ्यासाला बसणार अशाप्रकारे शो ऑफ सुरू होतो.
पालकांचे असे वेगवेगळे प्रकार आहे.तुम्ही देखील यातले काही प्रकारचे पालक आपल्या आजूबाजूला नक्कीच पाहिले असतील. अजूनही काही पालकांचे प्रकार आहेत.ते आपण पुढील भाग -२ मध्ये पाहुया.
तुम्हाला हा भाग कसा वाटला? हे मला कंमेंट द्वारे नक्की कळवा. इतरांना share करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल .काही प्रश्न असतील तर, ते कंमेंट मध्ये नक्की विचारू शकता.
माझा फेसबुक ग्रुप (मिशन positive parents) जॉईन करू शकता.
ग्रुप जॉईन करण्याकरिता👉मिशन positive parentइथे
क्लीक करा.
फेसबुक पेज लिंक- https://www.facebook.com/Positive-parenting-114348277829961/
हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद.🙏
Comments
Post a Comment