तुम्ही कोणत्या प्रकारचे पालक आहात?तुम्हीच ठरवा त्याकरिता जाणून घ्या ,पालकांचे 15 प्रकार.
तुम्ही कोणत्या प्रकारचे पालक आहात?तुम्हीच ठरवा त्याकरिता जाणून घ्या, पालकांचे 15 प्रकार. भाग -१ नमस्कार , तुम्ही कोणत्या प्रकारचे पालक आहात हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? पालकांचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? तुम्हाला तुमच्यामध्ये पालक म्हणून सकारात्मक बदल व्हावा असे वाटते का? जर वरील प्रश्नांची उत्तरे हो असतील तर हा ब्लॉग नक्कीच तुमच्याकरीताच आहे. चला तर मग सुरुवात करूया ... पालकांचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारांमध्ये कोणते ना कोणते पालक येतातच. असेही पालक आहेत जे त्यांचा स्वभाव कित्येक वर्ष आंधळेपणाने पुढे घेऊन जातात. आपल्या वागण्यामध्ये काही चुकीचे आहे. असे त्यांना कधीच वाटत नाही . इतर लोकांचा कधी त्यांना विचारही येत नाही .मुलांना योग्य संस्कार दिले पाहिजे किंवा मुलांचं कुठे काही चुकतं काय? आपलं काही चुकत तर नाही ना? किंवा स्वतःमध्ये काही बदल करायला हवेत का? आपण आपल्या मुलांसाठी आपल्या जीवनशैलीत काही बदल केलाय काय ?आपला आपण स्वभाव किती बदलला ?आपण स्वतः मध्ये आचारांमध्ये विचारांमध्ये किती बदल केलेत याचा विचार प्रत्येक पालकांनी करणे गरजेचे आहे. नमस्कार! मी भाग्यश्री फुल...