आदर्श पालक बना आनंदाने जीवन जगा,आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५जबरदस्त टिप्स
आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५ जबरदस्त टिप्स .....
भाग -३
नमस्कार,
आदर्श पालक बनायच आहे. परंतु त्याकरिता नेमकं काय करावं ?आपल्या मुलांसोबत सुसंवाद कसा साधावा ?आपल्या मुलांना योग्य वयात योग्य मार्गदर्शन कसं करावे? मुलांना त्यांच्या स्वास्थ संबंधित कसं प्रोत्साहित करावे? असे एक ना अनेक प्रश्न जर तुम्हाला भेडसावत असतील तर नक्कीच हा ब्लॉग नक्कीच तुमच्या करिताच आहे.
चला तर मग सुरुवात करूया.....
प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपण एक आदर्श पालक बनावं .पण त्याकरिता आपण रोजच्या जीवनात कोणकोणते बदल करायला हवे किंवा मुलांची मानसिकता कशी समजून घ्यावी. नेमक त्यांना कसे मार्गदर्शन करावे. यासारख्या गोष्टींकडे आपण फारसा लक्ष देत नाही परंतु आदर्श पालक बनायचं असेल तर तर सकारात्मकपणे त्याचा विचार करणे गरजेचे आहे आणि तुम्ही त्या दृष्टीने विचार करताय म्हणजेच तुमची आदर्श पालक बनण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे .या अगोदर भाग एक मध्ये व भाग दोन मध्ये आपण काही टिप्स पाहिल्या आहेत तर आज आपण भाग तीन मध्ये आपण पुढील टिप्स पाहणार आहोत.
नमस्कार! मी भाग्यश्री फुले positive parent coach मिशन positive parents या प्लॅटफॉर्मची संस्थापिका.
येत्या तीन वर्षात दहा हजार पालकांना आनंदी, सदृढ आणि समतोल पाल्य घडविण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे.
तर मग पुढील टिप्स पाहुयात....
11. मुलांबरोबर योग्य सुसंवाद साधा-
बऱ्याच पालकांना असं वाटतं की आपण आपल्या मुलाला चांगल्या शाळेत घातलं त्याच कौतुक केलं की आपल कामं संपलं परंतु असं होत नाही! तर मुलांसोबत योग्य सुसंवाद साधणे देखील तितकच महत्त्वाच आहे. मग हा सुसंवाद कसा साधायचा? तर मुलांना जेव्हा तुम्हाला काही सांगायचं असते तेव्हा तिथे आपली उपस्थिती संपूर्ण ठेवा, त्यांच्याकडे लक्षपूर्वक पहा, मुलांना कोणतीही गोष्ट सांगण्या मध्ये खूप उत्सुकता असते. तेव्हा त्यांच्या डोळ्यात बघून त्यांचं बोलणं नीट ऐका. कारण आपलं बोलणं कोणीतरी काळजीपूर्वक ऐकत आहे याचा आनंद त्यांच्या डोळ्यातून आपल्याला दिसतो. परंतु बऱ्याचदा मुल बोलत असतं आणि आई-वडील त्यांची काम करत राहतात. पेपर वाचतात ,टीव्ही पाहतात, घर आवरतात अशा वेळेस मुलांच्या बोलण्याकडे त्यांचं संपूर्ण लक्ष नसतं आणि त्यामुळे मुलांच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात.' मी इतक्या प्रेमाने मनापासून बोलतोय पण आई-बाबा मात्र लक्ष देत नाहीत' त्यांचं माझ्यावर प्रेमच नाही! त्यामुळे त्यांना एकटेपणा वाटू लागतो. म्हणून मुलांच्या प्रत्येक गोष्टीकडे नीट लक्ष देऊन त्याला प्रतिसाद द्यावा .म्हणजेच मुलालाही वाटेल की आपण एकटे नसून आई-वडील आपल्या सोबत आहेत .आणि त्यांना कोणतीही गोष्ट करण्यामध्ये उत्साह वाढेल. संवादाची सवय लहानपणापासूनच जर आपण लावली नाही तर, मोठे झाल्यावर इतरांशी मोकळेपणाने बोलू शकणार नाही. आणि मुलांचा आत्मविश्वास देखील बाहेर बोलताना कमी होतो. त्यामुळे जर आपण मुलांसोबत चांगला सुसंवाद जर केला तर आपल्या नात्यांमधील प्रेम सतत वाढत जाते आणि दुरावा हा कमी होतो. म्हणूनच आपल्या मुलांकडून जर सहकार्य अपेक्षित असेल तर, त्यांच्याबरोबर आपला संवाद कशाप्रकारे असायला हवा ?आपण मुलांशी कसं बोलावं? त्यांना कसं समजावून सांगावं? त्यांना प्रश्न कसे विचारावेत ? हे समजून घेतलं तर नक्कीच चांगला सुसंवाद होईल आणि परस्परांमध्ये सुदृढ निरोगी नातं निर्माण व्हायला सुरुवात होईल.
१२. एका स्वस्थ जीवन शैली करिता आपल्या मुलांना प्रोत्साहीत करा.-
आपल्या मुलांच्या जीवनशैली कडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. त्याकरिता मुलं पौष्टिक आहार ,योग्य व्यायाम आणि योग्य झोप घेतोय का हे पाहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सकारात्मक आणि स्वस्थ जीवन जगण्याकरिता मुलांना प्रोत्साहित करणे. हे देखिल तितकेच आवश्यक आहे. परंतु हे करत असताना मुलांना हे वाटता कामा नये की ,त्यांना आपण आपल्या इच्छेनुसार गोष्टी करण्यास भाग पाडतोय. त्याकरिता त्यांना स्वस्त जीवनशैलीचा योग्य मार्ग दाखवून त्याचे महत्त्व पटवून देऊन त्यांना त्या गोष्टी स्वतः समजू द्या. त्याचबरोबर त्यांना व्यायाम करण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी एक पद्धत म्हणजे त्यांना छोट्या वयातच एखाद्या खेळामध्ये सहभागी करावे .उदाहरणार्थ - स्केटिंग ,फुटबॉल, बॅडमिंटन जेणेकरून त्यातून त्यांचं मनोरंजन होईल आणि त्यांचे स्वास्थ्य देखील चांगले राहील. चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या खाण्यापिण्याच्या सवयी लहानपणापासूनच लावणे गरजेचे आहे. फास्टफूड देणे ,वारंवार चॉकलेट देणे या गोष्टी टाळणे फार गरजेचे आहे. लहान वयातच त्यांना चांगला healthy नास्ता, पौष्टिक जेवण दिले तर नक्कीच त्यांच स्वास्थ हे खूप चांगलं राहील. त्यामुळेच नेहमीच म्हटलं जातं की, लहान वयात लावलेल्या सवयी या नेहमीकरिता त्यांच्या सोबत राहतात. ताटातील जेवण पूर्ण संपविणे ,उष्ट न टाकने या सारख्या सवयी देखील मुलांना लावणे फार गरजेचे आहे.
१३. मुलांची योग्य वेळी प्रशंसा करा-
योग्य वेळी योग्य प्रमाणात मुलांची जर प्रशंसा केली तर मुलं लवकर खुलतात त्यांना त्यातून आनंद मिळतो .जस आपण एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात गाणं म्हटलं किंवा एखादी परफॉर्मन्स केला तर आपल्याला लगेच प्रेक्षकांची दाद मिळाली टाळ्या वाजवून की, आपल्याला आनंद होतो आणि छान वाटतं. तर मुलांचही तसंच असतं एखादी चांगलं काम केलं आणि त्यावेळी लगेच आपण त्यांची प्रशंसा केली तर त्यांना आनंद होतो आणि म्हणून मुलांनी एखादं चांगलं काम केल्यास त्यांना त्याच वेळी लगेचच शाबासकी द्यायला हवी. त्यात असं नको व्हायला की, अमुक दिवशी तू हे काम चांगलं केलं होतं म्हणून आता मी तुझी प्रशंसा करत आहे! असं होता कामा नये. कारण तोपर्यंत त्या गोष्टीचं महत्त्व संपलेलं असतं .म्हणून काही गोष्टी या योग्य वेळी होणे आवश्यक असतं.
१४. भौतिक सुखसोयींच्या सवयी मुलांना लावू नका-
जितकं शक्य आहे तितकं मुलांना भौतिक सुखसोयी पासून दुर ठेवा. कारण जितका जास्त comfort आपण आपल्या मुलांना देतो तितके ते कमजोर बनतात. तसेच हेही आवश्यक नाही की मुलांचा प्रत्येक हट्ट हा लगेच पूर्ण केला पाहिजे. बरेच पालकांना असं वाटतं की जर आम्ही सगळ्या गोष्टी देऊ शकतो तर मुलांना का देऊ नये ?परंतु मुलांना गरज नसताना आणि बिना मेहनत जेव्हा कोणतीही गोष्ट मिळते तेव्हा त्यांची त्यांना किंमत राहत नाही. म्हणून अशाच गरजा पूर्ण करा ज्याची खरंच त्यांना आवश्यकता आहे. आपण पूर्वीच्या काळात पाहिल असेल राजघराण्यातील मुले देखील राजमहल सोडून सुखसुविधा सोडून गुरुकुल किंवा आश्रमामध्ये राहायला जात असत .आणि सर्व कामे स्वतः करत असत. त्याच बरोबर ज्ञानप्राप्ती करीत होते. त्यामागे उद्देश एवढाच होता की मुलांनी स्वावलंबी बनावं आणि एक पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे की ,मुलांना सक्षम बनवणे जीवनामध्ये पुढे येणाऱ्या कठीण प्रसंगांना ते चांगल्या रीतीने तोंड देऊ शकतील यासाठी त्यांना तयार करणे.
१५. मुलांना योग्य वयात योग्य पद्धतीने मार्गदर्शन करा-
लालयेत् पंचवर्षाणि, दस वर्षांणि ताडयेत् ।
प्राप्ते तू षोडशे वर्षे, पुत्रं मिलवदाचरेत् ।।
मनुस्मृती मधील या श्लोकानुसार मुलांचा जो सुरुवातीचा काळ असतो म्हणजेच पाच वर्ष पर्यंतचा काळ हा योग्य त्या पद्धतीने त्यांचे पालन पोषण करणे ,लाड करणे आणि त्यानंतरची जे दहा वर्ष आहेत त्या काळात म्हणजे सहा ते पंधरा वर्ष (६-१५)पर्यंतचा काळ हा त्यांच्या ऍक्टिव्हिटी चे निरीक्षण करणे, त्यांना योग्य शिस्त आणि संस्कार शिकविण्याचा आहे आणि जेव्हा ते सोळा वर्षाचा होतं तेव्हा आपला मित्र असल्याप्रमाणे त्याच्यासोबत व्यवहार करणे ,योग्य ठिकाणी योग्य सल्ले देणे, त्याच्याशी चांगल्या पद्धतीने बोलणे व आपल्या विचारांची देवाण-घेवाण करणे .यासारख्या गोष्टी या वयात होणे आवश्यक आहे .परंतु आज आपल्याकडे फार विपरीत परिस्थिती पाहायला मिळते. कारण पालक वर्ग हा जन्मापासून पहिली पाच वर्ष मुलांसोबत मैत्रीपूर्ण व्यवहार असतो, नंतरच्या दहा वर्षात (६-१५) या वय वर्षांमध्ये पालक त्यांचं लालन-पालन करतात. म्हणजेच आपला योग्य असा वेळ देण्याऐवजी त्यांना गेम्स ,कंप्यूटर, मोबाईल ,बाईक यासारख्या त्यांना हव्या असलेल्या वस्तू available करून देतात आणि जसे ते १६ व्या वर्षात पदार्पण करतात लगेच त्यांच्यावर नजर ठेवणे सुरू करतात. कारण प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपले मुल हे कोणत्याही वाईट मार्गाला किंवा चुकीच्या संगतीत पडू नये .म्हणून जर योग्य वयात योग्य गोष्टी केल्यात तर ही चिंता करण्याची वेळच येणार नाही .म्हणून योग्य वयात मुलांना योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन करणे योग्य ते संस्कार देणे फार गरजेचे आहे. तेव्हाच आपली वाटचाल ही आदर्श पालक बनवण्याकडे होईल असे मला वाटते.
' तुमच्या मुलांसाठी तुम्ही सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती आहात'.
आई ही आपल्या मुलांची प्रथम गुरू असते. आणि जर प्रत्येक आईला वाटत असेल की आपल्या मुलानी शिवाजी महाराज व्हावं तर प्रथम तिने स्वतः जिजामाता बनायला हव. विचारांनी आचारांनी जिजामाता सावलीप्रमाणे शिवाजी बरोबर सतत होत्या आणि म्हणूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊ शकली. म्हणूनच जर मुलांचे भवितव्य उज्ज्वल घडवायच असेल तर आपणही त्यांच्याबरोबर चालायला हव.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला?हे मला कमेंट द्वारे नक्की कळवा.इतरांना share करा जेणेकरून त्यानाही माहिती मिळेल.काही प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारू शकता आणि अशाच महत्वाच्या टिप्स पाहिजे असतील तर,माझा फेसबुक ग्रुप (मिशन positive parent's)जॉइन करू शकता.
ग्रुप जॉईन करण्याकरिता👉 मिशन positive parents इथे क्लिक करा
हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद.
माझा या अगोदरचा ब्लॉग भाग- १ व भाग-२ वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
फेसबूक ग्रुप लिंक-
धन्यवाद!
Comments
Post a Comment