आदर्श पालक बना आनंदाने जीवन जगा, आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५जबरदस्त टिप्स-

आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५ जबरदस्त टिप्स..
भाग-१
तुम्हाला तुमच्या मुलाचे उज्वल भविष्य घडविणारा आदर्श पालक बनायचे आहे का? त्याकरिता काय करावे तेच कळत नाही आहे का? मुलांशी कसे वागावे हेच कळत नाही आहे का? जर वरील प्रश्नांची उत्तरे हो असतील तर हा ब्लॉग नक्कीच तुमच्याकरिताच आहे.
चला तर मग सुरवात करूया....
लहान मूल हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असते त्याला आपण जसा आकार देऊ तसे ते घडत असते. त्यामुळे त्यांना चांगले संस्कार देऊन त्याची सुंदर अशी मूर्ती घडवू शकतो.ज्याप्रमाणे पतंगाला जर मांजा नसेल तर ते उंच आकाशात उडू शकणार नाही त्याचप्रमाणे संतानरूपी पतंगाला जीवनरुपी आकाशात उंच उडण्याकरीता चांगल्या संस्काराची पालनपोषणाची जोड असणे आवश्यक आहे. पालक म्हणून आपल्याला मिळालेली ही संधी आहे. आपल्याला एक आदर्श पालक होण्याकरिता परफेक्ट असणे गरजेचे नाही कारण कोणीच परफेक्ट नसतं किंवा कोणतेही मुल देखील परफेक्ट नसतं हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. आपण पालक म्हणून आपल्या मुलाकडून फार अपेक्षा ठेवत असतो. परंतु आपल्या अपेक्षांचं ओझं आपल्या मुलांवर लादणे फार चुकीचे चुकीचे ठरू शकते परंतु एखादी ध्येय पूर्ण करायचे असेल तर, एक लक्ष निर्धारित करून काम करायचं आहे त्यामुळे तुम्हाला जर आदर्श पालक बनायचं असेल तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. नक्कीच तुम्हाला मदत होईल.
नमस्कार! मी भाग्यश्री फुले " positive parent coach" मिशन positive parents या प्लॅटफॉर्मची संस्थापिका,
येत्या तीन वर्षात दहा हजार पालकांना आनंदी, सुदृढ आणि समतोल पाल्य घडविण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे.
जर आपल्याला चांगली मुलं घडवायचे असतील तर आधी मुळांवर म्हणजे तुमच्या स्वतःवर काम करण्याची गरज आहे .कारण तुमच्या विचारांतून शब्द ,शब्दातून कृती ,कृतीतून सवयी आणि सवयीतून व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्त्वातून भविष्य घडत असते म्हणून जर भविष्य बदलायचं असेल तर स्वतःवर काम करणं गरजेच आहे.त्यामुळे ठरवलेलं ध्येय साध्य करू शकतो.
२.आपल्या मुलांचे प्रेरणास्त्रोत (role model)बना-
मुले ही अनुकरणशील असतात बहुतांशी गोष्टी ते आपल्या आईवडिलांकडून व आजूबाजूच्या वातावरणातून शिकत असतात त्यामुळे मुलांसोबत बोलताना विचार करून बोलावे कारण मुलांवर त्याचा प्रभाव पडतो म्हणून मुलांसमोर वागताना योग्य सन्मान पूर्वक वागावे व स्वतः नवीन नवीन गोष्टी शिकत राहावे. उदाहरणार्थ जर तुम्ही मोबाईल पाहत बसण्याऐवजी वाचन करत असाल तर मुलांना देखील तुम्हाला पाहून प्रेरणा मिळेल वाचनाची सवय लागेल.
३.मुलांसाठी वेळ काढा-
आपल्या मुलांना समजून घेण्यासाठी त्यांच्या साठी वेळ काढणे गरजेचे आहे .रोज थोडा तरी वेळ किमान अर्धा तास तरी मुलांसोबत घालवा त्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना समजून घेता येईल आणि मुलांनाही जाणीव होते की, आई -वडील त्यांची काळजी घेतात त्यांना प्रेम करतात उदाहरणार्थ आपण मुलांना गार्डन मध्ये फिरायला, खेळायला घेऊन जाऊ शकतो. घरातल्या घरात काही एक्टिविटी जसे की,ड्रॉइंग क्राफ्ट यासारख्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांच्यासोबत सहभागी होऊ शकतो.
४.भावनिक दृष्ट्या कनेक्ट होणे-
मुलांसोबत भावनिकदृष्ट्या कनेक्ट होणे खूप महत्त्वाचे आहे कारण जोपर्यंत connection नाही तोपर्यंत correction नाही त्यांच्या भावना समजून घ्या त्याकरिता त्यांचे काय म्हणणे आहे ऐकून घ्या. उदाहरणात मुलांसोबत लहान बनून आपण डान्स करणे त्यांच्यासोबत खेळ खेळणे अशा छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या गोष्टी लहान मुलांना खुप आवडतात त्यामुळे आपण मुलांसोबत एक छान बॉण्डिंग निर्माण करू शकतो.
५.मुलांसमोर भांडण करू नये-
पालक जेव्हा मुलांसमोर भांडण करत असतात तेव्हा मूल लहान असो किंवा मोठे त्यांच्यावर त्याचे कळत-नकळत परिणाम होत असतात. मुलांवर भावनात्मक व मानसिक परिणाम होत असतो. त्यांच्यामध्ये बाहेर आणि घरात असुरक्षिततेची भावना त्यांच्यात निर्माण होते तसेच पालकांप्रती एक निगेटिव्ह इमेज तयार होते त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो. त्यांच्यामध्ये खोटं बोलण्याची सवय निर्माण होऊ शकते व पालकांसोबत बॉण्डिंग मजबूत होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून पालकांनी मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवावा आणि शक्यतोवर मुलांसमोर भांडू नये.
'तुमच्या मुलांसाठी तुम्ही सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती आहात'.
अशा छोट्या छोट्या गोष्टी करून आपण स्वतः मध्ये थोडे बदल घडवून आणून एक आदर्श पालक बनण्याकडे वाटचाल करू शकतो स्वतः सोबत मुलांना देखील आनंद देऊ शकतो .अजून काही मुद्दे शिल्लक ते पुढील भागात पाहूया.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला?हे मला कमेंट द्वारे नक्की कळवा.इतरांना share करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल.काही प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारू शकता आणि अशाच महत्वाच्या टिप्स पाहिजे असतील तर,माझा फेसबुक ग्रुप (मिशन positive parents)जॉइन करू शकता.
ग्रुप जॉईन करण्याकरिता👉 मिशन positive parentsइथे क्लिक करा.
हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद🙏





Sunder blog 👏👍
ReplyDeleteThanku manisha tai
Deleteखूप छान भाग्यश्री👌👍. Keep it going
ReplyDeleteWonderful tips
ReplyDeleteVery nice tips
ReplyDeleteThank you
Deleteखूपच छान मार्गदर्शन
ReplyDeleteThank you
DeleteKhup chhan 👍👍👍
ReplyDeleteThank you
Delete