आदर्श पालक बना आनंदाने जीवन जगा, आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५जबरदस्त टिप्स-
आदर्श पालक बनण्याकरिता जाणून घ्या या १५ जबरदस्त टिप्स.. भाग-१ तुम्हाला तुमच्या मुलाचे उज्वल भविष्य घडविणारा आदर्श पालक बनायचे आहे का? त्याकरिता काय करावे तेच कळत नाही आहे का? मुलांशी कसे वागावे हेच कळत नाही आहे का? जर वरील प्रश्नांची उत्तरे हो असतील तर हा ब्लॉग नक्कीच तुमच्याकरिताच आहे. चला तर मग सुरवात करूया.... लहान मूल हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असते त्याला आपण जसा आकार देऊ तसे ते घडत असते. त्यामुळे त्यांना चांगले संस्कार देऊन त्याची सुंदर अशी मूर्ती घडवू शकतो.ज्याप्रमाणे पतंगाला जर मांजा नसेल तर ते उंच आकाशात उडू शकणार नाही त्याचप्रमाणे संतानरूपी पतंगाला जीवनरुपी आकाशात उंच उडण्याकरीता चांगल्या संस्काराची पालनपोषणाची जोड असणे आवश्यक आहे. पालक म्हणून आपल्याला मिळालेली ही संधी आहे. आपल्याला एक आदर्श पालक होण्याकरिता परफेक्ट असणे गरजेचे नाही कारण कोणीच परफेक्ट नसतं किंवा कोणतेही मुल देखील परफेक्ट नसतं हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. आपण पालक म्हणून आपल्या मुलाकडून फार अपेक्षा ठेवत असतो. परंतु आपल्या अपेक्षांचं ओझं आपल्या मुलांवर लादणे फार चुकीचे चुकीचे ठरू शकते परंतु एखादी ध्येय पूर्ण करा...